हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…

कोटा (राजस्थान): कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले (वय 17) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती गावात कळताच सर्वांना धक्का बसला आहे.

अविष्काराचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये ते राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद येथे शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचे कोटामधून शिक्षण पूर्ण झाले होते. त्याचे यश बघून अविष्कारलाही कोटा येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. पण, त्याने का आत्महत्या केली याचे कारण पुढे आलेले नाही. अविष्कार याने रविवारी (ता. २७) दुपारी 3.15 च्या सुमारास जवाहरनगरच्या कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यवरुन उडी मारून आत्महत्या केली.

अविष्कारने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावर परीक्षा दिली होती. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांनी अविष्कारला तातडीने रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी अविष्कारने रस्त्यात आपला जीव सोडला. आत्महत्या केल्याची माहिती कळतच सर्व नातेवाईकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, अविष्कारच्या आत्महत्येनंतर चार तासानंतर कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (वय 18) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संध्याकाळी सात वाजता कुन्हाडी येथील आपल्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. आदर्शची बहिण आणि चुलत भाऊ संध्याकाळी साडेसात वाजता फ्लॅटवर पोहचले तर दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी लटकलेल्या अवस्थेत होत्या. आदर्शला लगेच खाली उतरवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याने प्राण सोडले.

दरम्यान, कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!