हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 7 हुतात्मा जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील एक भावूक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
देवरियाचे हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंग यांना त्यांच्या शौर्य आणि हौतात्म्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्राने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र सन्मान स्वीकारताना कुण्या जवानाची आई डोळ्यात पाणी साठवून आली होती, तर कुणा जवानाची पत्नी पतीच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळाली. त्यापैकी एक असलेल्या हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांना कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे कीर्तीचक्र स्वीकारण्यासाठी अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि त्यांची आई मंजू सिंह आल्या होत्या. यावेली, स्मृती सिंह यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील अश्रू काळीज चिरणारे होते.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
हुतात्मांच्या पत्नी स्मृती आणि आईला राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र यावेळी हुतात्मा पत्नी स्मृती यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते आणि आता त्याची देशभरात चर्चा होत आहे. शहीद अंशुमन सिंग यांची पत्नी स्मृती आणि त्यांची आई यांना कीर्ती चक्र प्राप्त करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि स्मृती यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रत्येकजण भावूक होत आहे. हुतात्मा अंशुमनची पत्नी स्मृती सिंह हिने आपल्या शूर पतीच्या हौतात्म्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याने आपली प्रेमकहाणीही देश आणि जगासमोर मांडली आहे.
आपल्या हुतात्मा पतीच्या हौतात्म्याचे स्मरण करून कॅप्टन अंशुमनची पत्नी स्मृती म्हणाली, ‘कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. आम्ही दोघे एकमेकांना पाहताच प्रेमात पडलो. काही महिन्यांनी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये अंशुमनची निवड झाली. तो खूप कुशाग्र आणि हुशार होता. त्याची अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडही झाली. आम्ही फक्त 1 महिना भेटलो. यानंतर आमचे दोघांचे 8 वर्षे नाते होते. मग आमचं लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी अंशुमन सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात झाला. 18 जुलैला आम्ही दोघे खूप वेळ फोनवर बोललो. यादरम्यान आम्ही दोघांनी पुढील 50 वर्षांच्या भविष्याविषयी चर्चा केली. माझ्या घरासाठी आणि मुलांसाठीही योजना केल्या. पण 19 जुलैला सकाळी उठताच तिला फोन आला आणि तो आता या जगात नसल्याचे सांगण्यात आले.
Cpt #AnshumanSingh was awarded #KirtiChakra (posthumous). It was an emotional moment for his wife & Veer Nari Smt Smriti who accepted the award from #President Smt #DroupadiMurmu. Smt Smriti shares the story of her husband’s commitment & dedication towards the nation. Listen in! pic.twitter.com/SNZTwSDZ1Z
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) July 6, 2024
पहिले 7 ते 8 तास माझा या बातमीवर विश्वास बसत नव्हता. असे काही घडले हे मी मानायला तयार नव्हते. पण शेवटी हे सर्व खरे ठरले. मला अजूनही प्रश्न पडतो की हे सर्व खरेच घडले आहे का? पण आता माझ्या हातात कीर्ती चक्र आहे. हे सर्व खरे आहे. तो खऱ्या अर्थाने हिरो होता. त्यांनी अनेक सैनिकांचे प्राण वाचवले आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्राणही वाचवले. 19 जुलै 2023 रोजी पंजाब रेजिमेंटच्या 26 व्या बटालियनचे आर्मी मेडिकल कॉर्प्सचे कॅप्टन अंशुमन सिंग 17 हजार फूट उंचीवर सियाचीन ग्लेशियरवर होते. जोरदार वारे वाहत होते. त्यानंतर लष्कराच्या बंकरमध्ये आग लागली. या आगीत लष्कराचे अनेक जवान बंकरमध्ये अडकले. तेथे एक वैद्यकीय केंद्र देखील होते, ज्यामध्ये सैनिकांसाठी अनेक जीवरक्षक औषधे आणि उपकरणे ठेवण्यात आली होती. हे पाहून कॅप्टन अंशुमन सिंग लगेच बंकरमध्ये घुसले आणि तिथे अडकलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी, कॅप्टनने बंकरमध्ये अडकलेल्या सर्व सैनिकांची सुखरूप सुटका केली आणि जीवरक्षक औषधे वाचवण्यातही त्यांना यश आले. पण ते स्वतः आगीत होरपळून हुतात्मा झाले.
President Droupadi Murmu presents the Kirti Chakra (Posthumous) to Captain Anshuman Singh. #DefenceInvestitureCeremony @rashtrapatibhvn pic.twitter.com/CpWRHRjJbs
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) July 5, 2024
आपल्या पतीची ही शौर्यगाथा ऐकताना स्मृती सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळल होते. पांढरी साडी परिधान केलेल्या स्मृती यांनी भरलेल्या डोळ्यांनी पतीच्या सन्मानार्थ कीर्तीचक्र स्वीकारले. यावेळी, सभागृहातही भावूक वातावरण निर्माण झाले होते. स्मृती सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देशवासीयांकडून शहीद अंशुमन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांस सॅल्यूट केला जात आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं.. जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी… याची आठवण हा क्षण पाहताना आपसूकच होते.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…