
मोक्का १०९! हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील १६ जणांवर मोक्का; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील सुरज ऊर्फ चुस बाळु मोहीते (टोळी प्रमुख) व त्याच्या १५ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०९वी कारवाई केली आहे.
फिर्यादी हे १८/१२/२०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरात असताना परिसरात राहणारे अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे, लखन मोहिते, सुरज ऊर्फ चुस मोहिते, तुषार ऊर्फ बाळु मोहिते, सचिन खंडाळे, ओमकार देढे, पंकज कांबळे, गौरव झाटे, हसनेल अली शेनागो हे तोंडाला रुमाल बांधुन हातात धारदार शस्त्र घेवुन त्यांच्या घराच्या बाहेर आले व यापुर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादीला शिवीगाळ करुन तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी देवुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्राने वार करुन, दगड मारुन जखमी केले. तसेच सदर भागातील दुकानातील काऊंटरच्या काचा, बाहेर पार्क केलेली दुचाकी व चारचाकी वाहने, लोखंडी हत्याराने मारुन, तोडुन नुकसान केले. तसेच लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत सदर भागात दहशत निर्माण केली म्हणून त्यांच्याविरुध्द फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १९१५/२०२३ भादंवि कलम ३२४,४२७,१४३,१४४,१४५,१४८, १४९,५०४,५०६, कलम वाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(१)(३)सह १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी
१ ) सुरज ऊर्फ चुस बाळू मोहीते, वय – २२ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे ( टोळी प्रमुख) पाहिजे आरोपी
२) अनिकेत रविंद्र पाटोळे, वय – २३ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे
३) आदित्य रविंद्र पाटोळे, वय – २० वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे
४ ) तुषार बाळू मोहिते, वय-१९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे
५) नवनाथ ऊर्फ लखन बाळु मोहिते, वय १९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे
६) हासनेल अली शेनागो, वय- १९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे
७) गौरव विजय झाटे, वय-१९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे
८) ओमकार मारुती देढे, वय – १९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे.
९) पंकज विठ्ठल कांबळे, वय – २० वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे
१०) रविंद्र बाबुराव पाटोळे वय – ४६ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे (टोळी सदस्य )
११) सचिन मारुती खंडाळे, वय-२५ वर्ष, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे ( टोळी सदस्य,
पाहिजे आरोपी) अ.क्र.२ ते १० यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे, तसेच विधी
संघर्षित ०५ बालक हे ताब्यात असुन अ.क्र.१ व ११ हे पाहिजे आरोपी आहेत.
आरोपी सुरज ऊर्फ चुस बाळु मोहीते याने साथीदारासह दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व / दहशत रहावी म्हणुन व स्वतःच्या व इतरांसाठी गैरवाजवी अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरूध्द बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, दूखापत करणे असे गुन्हे दाखल असुन त्यांचे विरूध्द प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसून आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम-३(१)(ii).३(२).३(४)चा अंतर्भाव करणेची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम-२३ (१) (अ) प्रमाणे पुर्वमान्यता मिळणे कामी हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद शेळके यांनी पोलिस उप-आयुक्त, परीमंडळ – ५ पुणे शहर, आर, राजा यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी हडपसर पो.स्टे. गु.र.नं.१९१५/२०२३, भादंवि कलम ३२४,४२७, १४३, १४४, १४५, १४८,१४९,५०४,५०६,कलम वाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ प्रमाणे,आर्म अॅक्ट ४(२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ चा अंतर्भाव करणे बाबत मा. अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर अश्वीनी राख या करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त साो. परीमंडळ-५ पुणे शहर आर, राजा, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, अश्विनी राख त्यांचे मार्गर्शनाखाली हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदिप शिवले सहा. पोलिस निरीक्षक सारिका जगताप, पोलिस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, हनुमंत झगडे गिरीश एकोर्गे, बाबासाहेब शिंदे यांनी केलेली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईन लक्ष देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १०९ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…
मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…
मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…
मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

