आयटी इंजिनिअर प्रेयसीला भेटायला पुण्यात आला अन् नको ते घडलं…

पुणे: प्रियकरासोबत झालेल्या वादातून संगणक अभियंता असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्‍हवी पाठक (वय 23) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती मूळची बिहारची होती. शुक्रवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या उत्‍तर प्रदेश येथे राहणाऱ्या काकांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय 23, मूळ रा. पहाडगंज, दिल्‍ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्‍याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

जान्हवी आणि अमृतकुमार हे दोघे आधीपासून एकमेकांच्‍या ओळखीचे असून त्‍यांचे शालेय शिक्षण एकत्र झाले आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. जान्हवीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. तर आरोपी नोएडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. जान्‍हवी गेल्‍या दोन महिन्यांपासून पुण्यात राहत होती. आरोपी दोन दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी नोएडा येथून पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली उतरला. त्याचवेळी जान्हवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खराडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…

प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला…

पत्नीने लाईव्ह लोकेशन शेअर करून प्रियकराकडून केली नवऱ्याची हत्या…

पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!