
अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा मागील काही महिन्यांपासून गायब असल्यामुळे पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले होते. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. पण आचनक अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर हजर राहिल्या आहेत.
जया प्रदा सोमवारी (ता. ४) रामपूर न्यायालयात पोहोचल्या. फरार घोषित केलेल्या जया प्रदा यांना न्यायालयात पाहून सगळेच शॉक झाले. जयाप्रदा यांच्या रामपूर न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश जारी करण्यात आला होता. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध 9 वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. अभिनेत्री जया प्रदा यांना रामपूरच्या एमपी एमएलए कोर्ट दिलासा मिळाला आहे. जया प्रदा यांनी दाखल केलेला रिकॉल अर्ज कोर्टाकडून स्वीकारण्यात आला आहे. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर जयाप्रदा यांनी 7 वॉरंट बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहण्याचे खरं कारण सांगितले.
न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर जयाप्रदा म्हणाल्या, ‘मला दिलासा दिल्याबद्दल मी माननीय कोर्टाचे आभार मानू इच्छिते. मी 2 वेळा रामपूरमधून खासदार होते. तुम्ही सर्वांनी मला खासदार होण्याचा दर्जा दिला. तुम्हा सर्वांनी मला खूप प्रेम दिलं. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त बोलणार नाही. जे काही झालं आहे ते माझ्या तब्येतीमुळे झाले. माझं ब्लड प्रेशर हाय होत होते आणि शुगर लेव्हल वाढली होती. माझ्या कंबरेचे दुखणे सुरू आहे. माझ्या किडणीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस होते. त्यामुळे डॉक्टरांनी मला फिरण्यास नकार दिला होता. आताही मी त्याच परिस्थितीत आहे. माझी तब्येत आताही ठिक नाही. कोर्टाचा मी नेहमीच सन्मान केला आहे. मी माणूस आहे. मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन. येणाऱ्या दिवसात मी तुमच्या समोर येईन. नेहमीच जवळ असेल. जेव्हा जेव्हा निवडणूक असतात तेव्हा मी रामपूरमध्ये येते. जनतेची मागणी असेल तर मी रस्ता तयार करेन, यात माझा दोष नाही. मी पुन्हा न्यायालयाला सांगते की, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा.’
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने जयाप्रदा यांना उमेदवारी देण्यात आली होती. आझम खान हे समाजवादी पक्षाकडून त्या उभ्या राहिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. आचार संहिता लागू असताना त्यांच्या हस्ते नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन करण्यात आले. या प्रकरणात त्यांच्याविरोधात स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 2019च्याच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी कैमरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलिया मिश्रा गावात जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना त्यांना काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे…
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

