धक्कादायक! दोन लहान भावांचा कुऱ्हाडीने कापला गळा…

लखनौ (उत्तर प्रदेश): घरा समोर दुकान असलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश करून प्रथम 5 हजार रुपये पत्नी आजारी आहे मदत करा असे म्हटले आणि घरातील 6 आणि 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. डबल मर्डरच्या घटनेनंतर बदायू शहरात तणावाचे वातावरण आहे.

बदायूं जिल्ह्यात दोन मुलांच्या हृदयपिळवटून टाकणाऱ्या हत्याकांडात नवी माहिती समोर आली आहे. साजिद आणि जावेद हे समोरच्या घरात गेले. तिथे त्यांची चांगली ओळख होती, येणे जाणे होते. त्यामुळे ओळख होती, त्यांनी 5000 रुपये उधार मागितले, महिलेनं आपल्या पतीला विचारुन पैसे उधारही दिले. महिला खाली कॉसमॅटिक्स विकते तर घरात वरच्या मजल्यावर पार्लर चालवते. दरम्यान, साजिद वरच्या मजल्यावर गेला. जावेद खाली उभा राहिला. त्याने एका छोट्या मुलाला पाणी मागतिले, दुसऱ्याला चहा आणायला सांगितला. पहिला मुलगा पाणी घेऊन आला तेव्हा त्याचा खून केला. तर दुसरा मुलगा जेव्हा आला तेव्हा त्याच्यावरही वार केले. तिसऱ्या मुलाला त्यांनी पकडले होते. तिसरा मुलगा वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर साजिदने त्याच्यावरही हल्ला केला. मात्र, तो जीव मुठीत घेऊन पळाल्याने तो वाचला मात्र तो जखमी झाला आहे. आरडाओरडा झाला आणि साजिदने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावरील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. लोकांना ढकलून तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान, घटनेच्या काही तासांनंतर साजिद जवळच्या जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी केली. यादरम्यान साजिदने पोलिसांवर गोळीबार केला. या चकमकीत एक पोलिस जखमी झाला आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत साजिद ठार झाला आहे. तर जावेदचा शोध पोलिसांकडून अद्याप सुरू आहे.

नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…

टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप करायचे अन् लुटायचे…

दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…

पत्नीने रात्रीच्या वेळी दूध उकळून त्यात विष मिसळले अन् पुढे…

धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!