तोतया IAS महिला अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे; राजकीय नेत्यांना…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री मिळून देते म्हणून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना तिने फसवले असून, त्यांच्याकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात आल्याची माहिती आहे. आरोपीतील डिंपी हा दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम केलेला व्यक्ती असून डिंपी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता. कल्पनाही लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचे ऑफर देत पैसे उकळत होती. पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटीस दिल्या आहेत. त्यामध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले पठाण यांचाही समावेश आहे.

या प्रकरणी आता सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सेक्रेटरी असल्यालेले बनावट लेटर मिळाले आहे. त्यामुळे कल्पना भागवतचे अनेक कारणामे पोलीस तपासात समोर येत आहेत.

पोलिस तपासादरम्यान समोर आलेले कारणामे पुढीलप्रमाणे…
– कल्पना भागवत ही जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे.
– ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
– ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती आश्वासन देते.
– मोठ्या बदल्याचं काम करण्याचं आश्वासन देखील ती देते.
– पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे. तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलीस तपास करत आहेत.
– लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
– सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
– महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
– प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.

तोतया IAS महिलेच्या फोनमध्ये खळबळजनक खुलासे…

पुणे! विद्येच्या माहेरघरात तोतया डॉक्टर चालवत होता तब्बल 32 वर्षे दवाखाना…

तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं…

तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!