
…अखेर 42 आरोपीं विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षात सी.सी.आय. (भारतीय कापूस पणन महासंघ) ला खोटे विवरणपत्र, खोटे कागदपत्रे सादर करुन उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या आदेशावरून अपराध क्रमांक 621/2023 8 ऑगस्ट 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (आमडी 35), विजय विठ्ठलराव कडू (देवधरी 57), अडते भारत लक्ष्मण पोतराजे (घाटंजी 40), अक्षय अनिल गोडे (मुर्ली 35), गजानन नारायण यमसनवार (सायतखर्डा 55), संदीप विठोबा राऊत (देवधरी 31), सुहास गजानन यमसनवार (सायतखर्डा 40), किराणा व्यापारी अशोक नारायण यमसनवार (कुर्ली 50), अनिल श्रावण गोडे (मुर्ली 53), शाबुद्दीन गुलामहुसेन लालाणी (पारवा 50), गजानन लक्ष्मण ढवळे (घाटंजी 35), सुभाष बद्री जाधव (बोधडी 40), श्रीकांत रामशंकर बाजपेयी (बोधडी 50), मनोज महादेव घोडाम (वागदा 40), सुधाकर कृष्णराव भंडारवार (सावंगी संगम 60), शंकर लक्ष्मण चुनारकर (घाटंजी 65) व दिगांबर विठोबाजी कक्कन (घाटी 65) आदीं 17 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420 (फसवणूक करणे), 446, 464, 468 (बनावट दस्तऐवज तयार करणे), 469, 471 (बनावट दस्तऐवज खरे भासविणे) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. सदर प्रकरणात ॲड. रविंद्र सोनटक्के यांनी फिर्यादीची बाजू मांडली होती. सदर प्रकरणाची तक्रार घाटंजी तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केली होती.
सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजीचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी केला होता.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सदर प्रकरणाचा तपास करुन 5 महीन्यात अहवाल दाखल करण्याचे आदेश घाटंजी पोलिसांना दिले होते. मात्र, अनेक विभागाकडुन तपासाच्या अनुषंगाने माहिती प्राप्त करायची असल्याने सदर दोषारोपपत्र 30 एप्रिल 2024 रोजी घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जुन 2024 रोजी आहे. घाटंजी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात 42 आरोपी विरुद्ध भादंवि कलम 420 (फसवणूक करणे), 468(बनावट दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), सह कलम 34 (संगनमत करणे) आदीं गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरोपींची नावे अशी, अभिषेक ठाकरे, विजय कडू, अक्षय गोडे, गजानन यमसनवार, संदीप राऊत, सुहास यमसनवार, अनिल गोडे, गजानन ढवळे, सुभाष जाधव, श्रीकांत बाजपेयी, मनोज घोडाम, सुधाकर भंडारवार, शंकर चुनारकर, दिगांबर कक्कन, ज्योत्स्ना गोडे, महादेव बोरकर, प्रकाश काकडे, नत्थु राठोड, सदानंद शिदुरकर, बंडू घोडाम, आनंदराव लेणगुरे, भुराजी वसराम जाधव (मय्यत), राजेश जाधव, मनोज ठाकरे, पुंडलिक जोगी, गायत्री जाधव, विजय बाबाराव भुरे, तुळसाबाई जिवतोडे, सुशिला भोयर, प्रशांत गावंडे, शंकर देठे, संतोष होळकर, सरदारसिंग चंदेल, निलेश देठे, विरेंद्र देठे, उमेश देठे, स्वप्नील भंडारवार, संध्या भंडारवार, सुनिल राठोड, अशोक भंडारवार, विष्णू लेनगुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील गुणवंत चन्नावार आदीं 42 आरोपी विरुद्ध घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, भारत लक्ष्मण पोतराजे (घाटंजी), अशोक नारायण यमसनवार (कुर्ली) व शाबुद्दीन गुलामहुसेन लालाणी (पारवा) आदीं आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिसांनी आरोपपत्र ठेवलेले नाही. तथापि, सदर प्रकरणातील गैरअर्जदार भारत पोतराजे, अशोक यमसनवार व शाबुद्दीन लालाणी आदींनी कापूस खरेदी चौकशी समिती पुढे खोटे 7/12 उतारे, बनावट दस्तऐवज, चौकशी दरम्यान प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांचे विरुद्ध भांदवि कलम 420, 468, 471, सह कलम 34 आदीं गुन्हे नोंदवून त्यांचे नांव दोषारोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार/फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचीका दाखल करुन तिन्ही गैरअर्जदारांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी
स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

