पुणे शहरातील युनिट ६ला फरार आरोपीला गजाआड करण्यात यश…

पुणे (संदिप कद्रे): मोक्यातील सहा महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा 18/07/2024 रोजी शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त करीत होते. समीर पिलाने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गु र नं 48/2024 भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) प्रमाणे मोक्यातील पाहिजे आरोपी ऋषीकेश किसन खोड (वय 24 रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे) हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सदर बातमीच्या अनुशंगाने स्टाफसह जावून खात्री केली असता तो आम्हास पाहून पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी शैलेश बलकवडे (अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलिस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पो हवा विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो ना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केली आहे.

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…

पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!