पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

पुणे : पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिस गुगलची मदत घेणार आहेत. गुगलशी पत्रव्यवहार केला असून, पुणे वाहतूक पोलिस आणि गुगलमध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी करारही होणार आहे.

पुणे शहरातील वाहतुकीचे विश्लेषण गुगल इंटेलिजन्सद्वारे करून त्यावर उपाययोजना करता येतील. यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने गुगलसोबत करार करण्यासाठी पुणे पोलिसांना परवानगी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. पुणे पोलिस आयुक्तांकडून गुगल सोबत पत्र व्यवहाराला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरातील सिग्नलच्या वेळा ठरवण्यासाठी देखील गुगल मदत करणार आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुणे पोलिस दलात १० हजार पोलिस आहेत. त्यापैकी जवळपास एक हजार पोलिस हे वाहतूक शाखेत आहेत. शिवाय, मुख्य रस्त्यांवर अडीचशेच्या आसपास सिग्नल आहेत. सिग्नल नसणारे चौकही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेचे मनुष्यबळ पुरेसे ठरत नाही. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागते. पुणे पोलिस तंत्रज्ञानाची मदत घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

पुणे शहरात कोणत्या रस्त्यावर कोणत्या वेळेत वाहतूक कोंडी होते याची माहिती गुगल देणार आहे. वाहतूक कोंडीचा पॅटर्न, एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेव्हा इतर मार्गांवर कशी स्थिती असते? किती वाहने असतात याचा डेटा गुगल देईल. पुणे शहरातल्या रस्त्यांची माहिती गुगलकडे आहे. वाहतूक कोंडी होते तेव्हा पोलिस सिग्नल बंद करून वाहतूक नियंत्रण करतात. वाहतूक कोंडीसंदर्भात मुख्य रस्त्यावर आणि जोड रस्त्यावरील कोंडीची माहिती गुगलकडून मिळताच त्यानुसार वाहतूक पोलिस सिग्नलच्या वेळा ठरवतील. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!