
तळोजा कारागृहातील अंमली पदार्थांबाबत धक्कादायक प्रकार झाला उघड…
नवी मुंबई : एक पोलिस कर्मचारीच कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा आणि चरस असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तळोजा कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याकडून गांजा, चरस असे 10 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तळोजा कारागृहात तैनात असलेल्या एका हवालदाराने बुधवारी सायंकाळी रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात काही सापडले नाही. मात्र जेवणाच्या डब्यामध्ये १० लाख ८ हजार रुपये किंमतीचा गांजा, चरस आढळून आला आहे. खारघर पोलिस ठाण्यात चौकशीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. खारघर पोलिसांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या कॉन्स्टेबल अनिल जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…
खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…
कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…
येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

