
पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील विविध भागांमध्ये जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास युनिट ०५, गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केलेले होते. पोलिस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिटकडील अधिकारी व पोलिस अमंलदार हे हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरुन एक अल्पवयीन बालकास ससाणेनगर, हडपसर पुणे येथून ताब्यात घेवून त्याच्या कब्जातुन एकुण १० मोबाईल फोन मिळुन आले. त्याचेकडे चौकशी करता त्याने व त्याचा अल्पवयीन मित्र असे दोघांनी पुणे शहरातील विविध ठिकाणाहुन ते चोरलेले असल्याचे सांगीतले. त्याचे कडुन १,४५,५०० रुपये किंमतीचे १० मोबाईल फोन व एक मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. जप्त मोबाईल फोन बाबत खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) वानवडी पो.स्टे. गु.र.नं. ४८६ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४
२) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १७७६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १७७८ / २०२३ भा.द.वि.कलम ३७९
४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३०२ / २०२३ भा.द.वि.कलम ३७९
५) चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. ५४४ / २०२३ भा. द. वि. कलम ३७९
६) विमानतळ पो.स्टे. गु.र.नं. ५०९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
७) विमानतळ पो.स्टे. गु.र.नं. ५८९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
८) लोणावळा शहर, पुणे ग्रामीण पो.स्टे. गु.र.नं. ५३४ / २०२३
९) लोणावळा शहर, पुणे ग्रामीण पो.स्टे. गु.र.नं. ५३६ / २०२३
१०) चाकण पो.स्टे. गु.र.नं. ९७७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलिस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलिस अमंलदार आश्रूबा मोराळे, दया शेगर, रमेश साबळे, पल्लवी मोरे, राजस शेख, प्रताप गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे, विलास खंदारे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.

पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

