
पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात वारंवार घडणारे गंभीर गुन्हे, मारामरी, नागरिकांचे मालमत्तेचे तोडफोड करुन नुकसान करणे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यास प्रतिबंध व्हावा आणि कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलिंग करुन त्यादरम्यान प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारांना जेरबंद करुन शांतता प्रस्थापित करणेकामी सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे १२/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ५, कडुन युनिट कार्यक्षेत्रात युनिट ५ प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचेसह अधिकारी व अंमलदार असे हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
युनिट ५ कडील पथकाला बातमी मिळाली की, भोसले व्हिलेज सोसायटीचे कमानीचे पाठीमागे मोकळ्या जागेत ०५ संशईत इसम जमलेले असुन त्याचेजवळ घातक हत्यार असून ते जवळच असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंप वरील कॅश लुटणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीप्रमाणे बातमीच्या ठिकाणी युनिटकडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला, त्यादरम्यान नमुद व्यक्तींपैकी काही जणांना पोलिसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले व ३
जणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे
१) अमन संजय दिवेकर वय २२ वर्षे रा. लेन नंबर ४, जयहिंदनगर,अप्पर इंदिरानगर, पुणे
२) विशाल संजय लोखंडे वय २४ वर्षे रा. कांबळे वस्ती, अप्पर इंदिरानगर, पुणे व
३) विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यातुन एकुण ६५,९४०/- रुपये कि चा मुद्देमाल त्यामध्ये दोन कोयते, लाल मिरची पावडर, नायलॉनची दोरी असे घातक शस्त्रे व साधने जप्त करण्यात आलेली आहे.

त्यांच्याकडे सदरबाबत विचारणा करता, वर नमुद तीन जण व पळुन गेलेले त्यांचे इतर ३ साथीदारासह विठ्ठल पेट्रोलपंपावर दिवसभरात गोळा झालेली कॅश कॅशीयर रुममध्ये जमा झालेली कॅश आम्ही पाच जण मिळुन कॅशीयरला कोयत्याचा धाक दाखवुन ती कॅश लुटण्याकरीता जाणार होतो, वगैरे सांगितले. तसेच त्यांचेकडे केलेल्या सखोल तपासात व त्यांचे ताब्यात मिळालेल्या दोन मोबाईल फोन हे कोढवा पोलिस स्टेशनचे हद्दीत रात्रीचे वेळी नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरी केल्याचे व त्यांनी हडपसर पोलिस ठाणे हद्दीत एका इसमाची जबरदस्तीने कॅश लुटली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुध्द हडपसर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.
१२९२ / २०२३, भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ व भा. ह. का. कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस करीत आहे. आरोपींकडून कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी केलेले खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.
१) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. १२६५ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४
२) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. १२३९ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२,५०४,५०६, ४२७, ३४
३) हपडसर पो.स्टे.गु.र.नं. १८९१ / २०२३ भा. द. वि. कलम ३९२,३४ वर नमुद ताब्यातील आरोपीतांचा पुर्वइतिहास पाहता त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) विशाल संजय लोखंडे, वय – २४ वर्षे, (१५ गुन्हे दाखल आहे.)
१. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५७७/२०१८ भादंवि ३७९
२. वानवडी पो. स्टे गु.र. न. ५ / २०२० भादंवि ३९२ ३४१ ३४
३. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३०९ / २०२० भादंवि ४५४४५७३८०
४. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३११ / २०२० भादंवि ३७९
५. स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. ५७ / २०२१ भादंवि ३७९
६. बिबवेवाडी पो.स्टे. गु.र.नं. १२४ / २०२१ भादंवि ३८०
७. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०१ / २०२२ भादंवि ३७९
८. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०६ / २०२२ भादंवि ३९२
९. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०० / २०२२ भादंवि ३९२
१०. भारती विद्यापीठ पो.स्टे. गु.र.नं. ५२ / २०२२ भादंवि ३९२ ३४
११. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५६ / २०२२ भादंवि ३९२ ३४
१२. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १२०९ / २०२० भादंवि ३७९
१३. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५६ / २०२२ भादंवि ३९२ ३४
१४. कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ८३ / २०२२ भादंवि कलम ३९२
१५. बिबवेवाडी पो.स्टे. गु.र.नं. १९ / २०२२ भादंवि ३८०
२) अमन संजय दिवेकर, वय – २२ वर्षे, ( ०३ गुन्हे दाखल आहे. )
१. बिबवेवाडी पो.स्टे. गु.र.नं. ३६९/२०१९ भादंवि ३२४३३३४
२. बिबवेवाडी पो.स्टे. गु.र. नं. ६३० / २०२० भादंवि ३२४ ३२६ ४२७ ३४ मपोक ३७(१)(३) १३५
३. बिबवेवाडी पो.स्टे. गु.र.नं. गु.र.नं. ६५५/२०२० भादंवि ३९४ ३२३ ५०४ ३४ क्रि.अॅ. अॅक्ट ७
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलिस अमंलदार, रमेश साबळे, राजस शेख, आश्रुबा मोराळे, प्रताप गायकवाड, शहाजी काळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.
पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…
पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पुणे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी घेतले ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

