
महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपीस युनिट ६ ने शिताफीने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले आहे. विविध पोलिस स्टेशन हद्दीत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं. १८४२/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हंसराज रणजितसिंग टाक याने केलेला असून तो कॅनॉल रोड, हडपसर, पुणे येथे येणार आहे. खात्रीशिर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-६चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे) यास १३/१२/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिली. त्यास १३/१२/२०२३ रोजी अटक करुन त्याची पोलिस कस्टडीची रिमांड घेण्यात आली.
रिमांड मुदतीत त्याच्याकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्याचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुण ०६,१०,५००/- रु.किं. चे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो.स्टे कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हडपसर पोस्टे १८४२ / २०२३ भादवि ३८०,४५४,४५७
२) लोणी काळभोर पो.स्टे ५९९ / २३ भादंवि ४५४ ३८०
३) लोणी काळभोर पो.स्टे ७३१ / २०२३ भादवि ४५४ ४५७,३८०
४) कोंढवा पो.स्टे १२५७/२०२३ भादवि ४५७,३८०
५) कोंढवा पो.स्टे गु.र.नं. १२०५ / २०२३ भादवि ४५४,३८०
६) लोणीकंद पो.स्टे ४५९/२०२३ भादवि ४५४३८०
७) लोणीकंद पो.स्टे ६५१/२०२३ भादंवि ४५४ ३८०
आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो. स्टे चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
१) कोतवाली पो.स्टे अहमदनगर गु.र.नं. ११७९/२०२३ भा.द.वि.क.३९५,३८०,४५७
२) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.
७३० / २०२३ भा.द.वि.क.३९५,३९२, ३४ आर्म अॅक्ट ३, ४ (२५)
३) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२२ / २०२३ भा.द.वि.क.३८०,४५७
४) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२९ / २०२३ भा.द.वि.३५३
५) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७३२ / २०२३ भा.द.वि.क.३७९
६) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ३८७/२०२३ भा.द.वि.क.३७९
७) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ३८९/२०२३भा.द.वि.क.३७९
८) फौजदारी चावडी पो.स्टे सोलापुर शहर गु.र.नं. ६०५ / २०२३ भा.द.वि.क.३७९
९) वळसंग पो.स्टे. सोलापुर ग्रामीण गु.र.नं. ४३९ / २०२३ भा.द.वि.क ४५७,३८०
१०) हडपसर पो.स्टे गु.र.नं. १३४५/२०२३ भा.द.वि.क.३९५,३९७,५०४,५०६ आर्म ऍक्ट ३ (२५)
संबंधित गुन्हयाचा तपास रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…
मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश…
पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

