
स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…
रांची (झारखंड): एका स्पॅनिश महिला (वय २८) पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेनेकथन केलेल्या घटनेची भयावह कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.
दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘घटनेदरम्यान सात आरोपी तिला सतत लाथाबुक्क्या मारत होते. बलात्कार करणाऱ्या आरोपीने तिच्या पतीचे हात बांधले आणि त्याला मारहाणही केली. आरोपी माझी हत्या करतील असे वाटले. परंतु देवाच्या कृपेने आज मी जिवंत आहे.’
स्पॅनिश महिला आणि तिचा ६४ वर्षीय पती बांगलादेशातून वेगवेगळ्या दुचाकीवरून टूरवर निघाले होते आणि झारखंडमार्गे नेपाळला जात होते. त्यावेळी शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर स्पॅनिश महिलेला सरैयाहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ ही घटना घडली आहे.
एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांपैकी तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून उर्वरित चौघांना लवकरच पकडण्यात येईल. इतर चार आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस नवी दिल्लीतील स्पेनच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत.’
धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार…
शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय…
विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…
सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…
विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…
युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

