पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पुणे (संदिप कद्रे): लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस दलात मोठ्या मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. या सर्व लोकांच्या संरक्षण व्यवस्थेत कार्यरत असलेल्या 350 पेक्षा जास्त मनुष्यबळाचा वापर आता निवडणुकी दरम्यान नियमित कामासाठी केला जाणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात यासाठी मोठी मदत होणार आहे.

पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांकडून संरक्षण व्यवस्था पुरविण्यात येते पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. पुणे शहरातील 110 जणांना पोलिसांकडून संरक्षण पुरविण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यासाठी अंदाजे 350 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत होता. पोलिस आयुक्त्यांच्या आदेशानुसार आता 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे.

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…

पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!