धक्कादायक! गळा कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह…

नाशिक: सातपूर परिसरातील विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक्तीबाई बैस (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मुळ मध्य प्रदेशची आहे. तिचा पती औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीत कामाला आहे. एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले या महिलेला आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे. महिलेची आत्महत्या आहे की हत्या हे शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!