पुणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सलग २३ दिवस १७० CCTV कॅमेरे तपासले अन्…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ व २, गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. घरफोडी चोरी करणा-या आरोपीकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

१७/०५/२०२५ रोजी ते दिनांक १८/०५/२०२५ रोजी हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि नं ४७७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३)(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस अंमलदार यांना नंबर प्लेट नसलेली एक यामाहा कंपनीची R15 संशयित मोटार सायकल मिळून आली. सदर मोटार सायकलबाबत संशय आल्याने सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले असता सदर सी.सी.टि.व्ही. कॅमे-यामध्ये घरफोडी चोरी करणा-या आरोपीने सदर मोटार सायकलचा वापर केल्याचे समजलेय त्यानंतर सदर आरोपीचा सोलापुर, बार्शी, धाराशिव, भुम परांडा याठिकाणी शोध घेतला. त्यानंतर दिनांक ११/०६/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण काळुखे व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील सपोनि सी बी बेरड व पोलिस अंमलदार तसेच घरफोडी/चैन-स्नॅचिंग पथकातील पोलिस अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास केला. अंमलदार यांनी सलग २३ दिवस तपास करुन अंदाजे १७० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन त्याआधारे व तांत्रिक विश्लेषण करुन गोपनिय माहिती काढली.

आरोपीचा शोध घेत असताना पथकास मिळालेल्या बातमीदारामार्फत सदरचा घरफोडी करणारा संशयित आरोपी यास गोडबोले वस्तीजवळ, मांजरी, पुणे येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. रोहित विलास अंधारे (वय- २५ वर्षे, धंदा- एक्स-रे टेक्नीशियन, रा.मुळगाव- भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने समांतर तपास करता त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये चोरी करुन नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास करुन नमुद आरोपीकडुन एकुण ४३,५५,०००/- रु किं.चा ४८ तोळे वजनाचे सोन्याचे डायमंडचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त,गुन्हे, पंकज देशमुख, पोलिस उप आयुक्त,गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे- १ गणेश इंगळे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे- २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, सहा.पोलिस निरीक्षक सी.बी. बेरड, व पोलिस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड,धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर, सुरेश जाधव यांनी केली आहे.

पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…

Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…

पुणे! एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणूक करणारे ताब्यात…

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…

Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!