पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. एक जण बचावला आहे.
पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते. रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला. धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली.
अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) असे आहे. अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि युवती हरप्रित यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलीसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृत व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…
समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…