
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना आद (बुधवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून, या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
दिपाली सोनी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) असे जखमीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51 राहणार भवानी पेठ, पुणे ) यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड गंगाधाम या अत्यंत रहदारीच्या मार्गावरुन सोनी हे दुचाकीवरून जात होते. गंगाधाम चौकात आल्या नंतर सिंगल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले. यामध्ये महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघात प्रकारणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

