
पुणे! एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणुक करणा-या ०२ सराईतांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम व वेगवेगळया बँकांचे ०४ एटीएम कार्ड तसेच एटीएम मशीनचे कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
समर्थ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- १२२/२०२५ भा.न्या.संहिता कलम-३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असून, दाखल गुन्हयातील फिर्यादी हे दि.०५/०६/२०२५ रोजी रात्रौ २०/०५ वा.चे सुमा.रास्ता पेठ येथील राज रेस्टॉरंट समोरील बॅक ऑफ इंडियाचे एटीएम मध्ये पैसे काढण्याकरीता गेले होते. सदर एटीएम मशीन मधून पैसे बाहेर न आल्याने फिर्यादी यांची फसवणुक झाल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरीष्ठांच्या आदेशाने वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील अज्ञाताचा शोध घेणे करीता समर्थ पोलिस स्टेशन कडील तपास पथक रवाना केले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलिस स्टाफने राज रेस्टॉरंट समोरील बॅक ऑफ इंडियाचे एटीएम बाहेर सापळा रचून ०६/०६/२०२५ रोजी सदर बँक ऑफ इंडियाचे एटीएम रूम मध्ये दोन व्यक्ती येवून ते त्यांच्याकडील स्क्रू ड्रायव्हरने एटीएम मशीनशी छेडछाड करू लागल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) संतोष कुमार किशोरीलाल सरोज (वय २८ वर्षे रा.मु.पो.पुरे बैसरो कटरा गुलाग सिंग, ता. प्रतापगढ जिल्हा प्रतापगढ (उत्तर प्रदेश) सध्या पुणे फिरस्ता, २) प्रदिप कुमार नंदकिशोर मौर्या (वय २६ वर्षे रा. मु.पो.मानधाता ता . प्रतापगढ जिल्हा प्रतापगढ (उत्तर प्रदेश) सध्या पुणे फिरस्ता) असे असल्याचे सांगितले.
आरोपींनी ०५/०६/२०२५ रोजी सदर एटीएम मशीन मधून पैसे निघण्याच्या ठिकाणी एक काळी पट्टी लावली असल्याचे सांगून ते पट्टी मध्ये अडकलेले पैसे घेण्याकरीता आले असल्याचे सांगितले. दोघांची अधिक माहिती काढली असता त्यांच्यावर यापुर्वी एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून आर्थिक फसवणुक केले बाबत वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. यावरून त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झालेवरुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतांकडुन रोख रक्कम व वेगवेगळया बॅकांचे ०४ एटीएम कार्ड तसेच एटीएम मशीनचे कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त करण्यात आली असुन अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे, पोलिस उप-आयुक्त परि- १, पुणे शहर निखील पिंगळे, (अतिरीक्त कार्यभार), सहा. पोलिस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ उमेश गित्ते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सपोफो/पागार, पोलिस अंलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…

