विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…

बीड: विवाहबाह्य संबंधांतून पत्नीनंच पतीचा काटा काढला असून पोलिसांनी मृत किरण सोनवणे यांची पत्नी प्रियंका सोनवणे हिला अटक केली आहे. किरण आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेला आणि तिचं पतीच्या मित्रासोबतच जुळलं. या घटनेमुळे लिंबागणेश परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेले आणि त्यातून प्रियंका व किरणचा मित्र दशरथ परदेशी यांच्यात जवळीक निर्माण झाली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. याच दरम्यान पतीपासून वेगळं होण्यासाठी दोघांनी मिळून खुनाचा कट रचल्याचा प्रकार तपासातून पुढे आला आहे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये दीर्घकाळ फोनवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटात धीरज येडे यालाही सामील करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांच्या तपासानुसार, घटनेच्या रात्री किरणला दारू पाजली. नशेतच दशरथ किरणला सोबत घेऊन एका गाडीवर तर धीरज दुसऱ्या गाडीवर निघाले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवून दशरथ याने किरणच्याच रुमालाने त्याचा गळा आवळला. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आरोपींनी हा प्रकार अपघातासारखा भासावा यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवला. तसेच त्यावर दुचाकी टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर आरोपी दशरथ आणि प्रियंका यांच्यात फोनद्वारे संपर्क झाल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘कार्यक्रम ओके’ म्हणून कट यशस्वी झाल्याची माहिती या संभाषणातून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कॉलच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. दरम्यान, आरोपी धीरज याने स्वतःच्या वाहनातून मृतदेह रुग्णालयात नेण्यास मदत केल्याचेही समोर आले आहे.

शवविच्छेदन अहवालात गळ्यावर आढळलेल्या खुणांमुळे पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय आला होता. त्यानंतर तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. तपास सुरू असताना दोन आरोपी फरार झाले होते. मात्र, त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली. पुढील चौकशीत पत्नीचाही सहभाग उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…

लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…

सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!