अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा व एकूण ₹ 15,000 द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले.

सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश देविदास मोरे (पांढरकवडा) यांनी मांडली. तर आरोपी तर्फे ॲड. विनायक काकडे (वणी) यांनी काम पाहिले. झरी जामणी तालुक्यातील टेंभी येथील संजय भिमराव मडावी याचे घरी दुपारी 1 वाजता कापूस भरण्यासाठी आरोपी अनिल लालू मोरे व इतर दोन मजूर कापूस भरण्यासाठी गेले होते. कापूस भरल्यानंतर कापूस भरलेले वाहन निघून गेले. तेथे अल्पवयीन पिडीता ही अंगणात खेळत होती. आरोपी अनिल मोरे याने अल्पवयीन पिडीतेला चिवडा घेऊन देतो, असे म्हणून आरोपीने तिला कडेवर घेऊन एका पानठेल्यावर गेला व तेथे तिला चिवडा घेऊन दिला. त्यानंतर अल्पवयीन पिडीतेला अर्धवट बांधकाम असलेल्या घरात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना अल्पवयीन पिडीतेने घरी येऊन आईला सांगितली. त्यानंतर पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सदर तक्रारीवरून आरोपी अनिल लालू मोरे विरुद्ध पाटण पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376 (AB), 376 (2) (J), 511 व बाल लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पाटण येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता हेलोंडे (API) यांनी करून पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात भादंवि कलम 376 (AB), 511 अंतर्गत आरोपी अनिल लालू मोरे यांस 10 वर्षाचा सश्रम कारावास, भादंवि कलम 376 (2) (J) अंतर्गत 7 वर्ष सश्रम कारावास व एकूण ₹ 15,000 द्रव्य दंड, दंड न भरल्यास आणखी ३ महीण्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगावयाची आहे.

सदर प्रकरणात शासनातर्फे पांढरकवडा येथील सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश देविदास मोरे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. या निकालामुळे झरी जामणी तालुक्यात खळबळ माजली आहे.

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!