पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची हत्या…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची सात ते आठ जणांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अमोल गोरगले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवरही हल्ला झाला असून, ती व्यक्ती जखमी झाली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रावेत परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
अमोल गोरगलेवर सोमवारी रात्री सात ते आठ जणांनी हल्ला केला. यात अमोल गोरगले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयाने नेण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा हात असल्याचे समोर आले असून पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवेळी अमोल गोरगले आणि शेखर ओव्हाळ यांच्यात वाद झाला होता. शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पोटनिवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अमोल गोरगलेवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यापूर्वी गोरगले तुरुंगातून बाहेर आला होता.
Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…
Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते
माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…