कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या गुन्हयात ४ महिने फरारी असणाऱ्या दोन आरोपीना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९३ / २०२३ भादवि कलम ३०२, ३२४, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर गुन्हयातील मयत सख्ये मावस भाऊ असून त्याचा फ्रेबरीकेशनचा व्यवसायातुन वाद झाल्याने यातील फिर्यादी यांना लाकडी बाबूने डोक्यात मारल्याने त्यांना चक्कर आल्याने ते खाली बसले. त्याचा वाद सोडविण्यासाठी मयत व्यक्ती गेला असता त्याला सुध्दा दोन्ही पाहिजे आरोपीने हाताने व लाकडी बाबूने डोक्यात मारल्याने त्याला प्रथम उपचारासाठी हॉस्पीटल दाखल केले. सदर ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर ससून हॉस्पीटल येथे अॅडमीट केले असता त्याचे डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याबाबत वरिलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयात आरोपी सर्फराज उर्फ टारजन हबीब खान व तनवीर हबीब खान हे गुन्हा केल्यापासून गेले ४ महिने फरारी होते. सदर आरोपी याचा तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस हवालदार ६४८४ मिसाळ, पोलिस अंमलदार ८३५२ महारनवर यानी आरोपीचे मोबाईल नंबरचे सीडीआर व एसडीआर च्या सहाय्याने त्याचे मुळ पत्ता राही रायबरेली इस्लामीया उर्दू स्कूलच्या जवळ नाहरीया जि. रायबरेली राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. वरिष्ठाच्या परवानगीने लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश येथे जाऊन आरोपीचे दाजी याचेकडे जाऊन आरोपीबाबत चौकशी केली असता त्यानी दोन्ही आरोपी त्याचे मुळ गावी असल्याचे सांगितले. आम्ही नमुद आरोपीचा पत्ता राही रायबरेली इस्लामीया उर्दू स्कूलच्या जवळ नाहरीया जि. रायबरेली राज्य उत्तर प्रदेश सदरचे ठिकाण मिलएरिया पोलिस ठाणे, जि रायबरेली राज्य उत्तरप्रदेश अंतर्गत येत असल्याने नमुद पोलिस ठाण्याकडील स्टाफ याचे मदतीने वरील स्टाफ असे आरोपीचे दिले पत्यावर शोध घेणेकामी गेलो असता. गुन्हयातील पाहिजे आरोपी तनवीर हबीब खान हा पोलिसांना पाहून सदर ठिकाणावरुन जंगलात पळून गेला होता.

२२/११/२०२३ रोजी सकाळी जंगलातून बाहेर आल्याने आम्हाला पाहून पुन्हा पळुन जावू लागला असता त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. मिलएरिया पोलिस ठाणे, जि रायबरेली येथे घेऊन आलो. त्याचेकडे पाहिजे आरोपी बाबत चौकशी केली असता त्याने सर्फराज उर्फ टारजन हबीब खान हा हिलगी जि रायबरेली येथे असल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता सर्फराज उर्फ टारजन हबीब खान सदर ठिकाणी मिळून आल्याने त्याना रायबरेली उत्तरप्रदेश येथून कोंढवा पोलिस ठाणे येथे घेऊन आलो असता त्याना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद दाखल गुन्हयाचा पुढील तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलिस निरीक्षक हे करित आहेत. २९/११/२०२३ रोजी पावेतो पोलिस कस्टडीमध्ये आहेत.

संबंधित कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेशकुमार, रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, विक्रांत देखमुख, पोलिस उप आयुक्त परि. ०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि उसगांवकर, पोलिस हवालदार ६४८४ मिसाळ, पोलिस अंमलदार ८३५२ महारनवर यानी केली आहे.

कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…

कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…

कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…

कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!