
महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) यांना वीरमरण आले आहे. 2019 साली सुनिल विठ्ठल गुजर हे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सुनिल गुजर यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे.
सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते मणीपूर येथे 110 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजवत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800 फूट खोल दरीमध्ये कोसळले आणि अपघात झाला. या अपघातामध्ये सुनिल गुजर यांचा मृत्यू झाला.
मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणारे वाहन दरीमध्ये कोसळले. या अपघातामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला, तर 13 जवान जखमी झाले. या अपघातामध्ये दोन जवान जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग गावात झालेल्या अपघाताबाबत मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
सुनील गुजर यांना अवघा सहा महिन्यांचा चिमुकला असून गेल्या सहा महिन्यांपासून घरी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, बाप लेकाची भेट होण्यापूर्वीच सुनील गुजर यांना कर्तव्यावर वीरमरण आले आहे.
सुनील यांचा 2022 मध्ये स्वप्नाली पाटील यांच्याशी विवाह झाला. आठ महिन्यापूर्वी काही दिवसाची रजा काढून ते गावी आले होते. पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी ते अधिकच्या सुट्टीत प्रयत्नात होते. पुन्हा लवकरच परत येऊ असे सांगून आई-वडिलांसह पत्नीचा निरोप घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते. सुट्टी मिळत नसल्याने सुनील यांना बाळाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती. पत्नी स्वप्नाली सुद्धा आपल्या माहेराहून सासरी सुनीलच्या घरी आल्या आहेत. 11 मार्चला गावी घरी येणारा सुनील सुट्टी पुढे ढकलल्याने येऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी आठ दिवसानंतर गावी येतो आणि गावची जत्रा करूनच परत जातो असे सांगितले. चार दिवसापूर्वीच त्याचे पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांच्या बरोबर बोलणे झाले होते. गावाकडे येण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना सुनील यांना वीरमरण आले. प्रत्यक्षात बापलेकांची प्रत्यक्ष भेट आणि एकमेकांना मायेचा स्पर्श झालाच नाही. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!