IPS ओम प्रकाश मासे खात असतानाच काढला त्यांचा ‘काटा’…

बंगळूरू: कर्नाटकचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि IPS ओम प्रकाश यांच्या हत्येबाबत पत्नी पल्लवी आणि मुलीवर आरोप आहे. डायनिंग टेबलवर बसून मासे खात असताना वाद झाला आणि ओम प्रकाश यांच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पत्नी आणि मुलगी कृती हिला पोलिसांनी अटक केली आहे.

ओमप्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून मासे खात होते. त्याच वेळी त्यांचा पत्नी पल्लवी सोबत वाद सुरू झाला. यावेळी चिडलेल्या पल्लवी हिने डायनिंग टेबलवरील चटणी ओम प्रकाश यांच्या डोळ्यात टाकली. वेदना सहन न झालेले ओम प्रकाश त्यावेळी सैरभैर झाले. त्यानंतर संधीचा फायदा घेत पल्लवीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये ओम प्रकाश जबर जखमी झाले आणि 20 मिनिटे तडफडत राहिले.

ओम प्रकाश नेहमीच बंदुकीचा धाक दाखवून आपल्याला ठार मारण्याची धमकी द्यायचे, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला. पण त्यांच्या मुलाने, कार्तिकेशने मात्र त्याच्या आईवर आणि बहिणीवर वडिलांना मारल्याचा आरोप केला आहे. ओम प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना पल्लवी तिथेच होती. त्याचवेळी पल्लवीने तिच्या एका मित्राला व्हिडीओ कॉल केला आणि ‘राक्षसाला मी मारून टाकले’ असे सांगितलं. त्यानंतर तिने पोलिसांना फोन करुन ओम प्रकाश यांची हत्या केल्याची कबुली दिली.

दरम्यान, पल्लवी गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. पल्लवी सिजोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असल्याचे कार्तिकेशने म्हटले आहे. तिच्या उपचारावर मोठा खर्च होत होता. पल्लवी आणि बहीण कृतीनेच आपल्या वडिलांना मारले आहे. घटना घडण्यापूर्वी एक आठवडापूर्वी आपल्या आईने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे वडील त्यांच्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. दोन दिवसांपूर्वी बहीण कृतीने सरिताच्या घरी जाऊन जबरदस्तीने वडिलांना घरी परत आणलं. त्यांची इच्छा नसतानाही तिने त्यांना घरी परत आणले अशी माहिती कार्तिकेशने दिली. मुलाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पल्लवी आणि कृती यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…

पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!