कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस ठाणे तपासपथकाने नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर दमदार कामगिरी केली असून, रेकार्डवरिल सराईत गुन्हेगारांकडून ७ अवैध पिस्टल व २४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात बेकाशयदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणा-यांचा व आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले, पोलिस निरीक्षक गुन्हे यांनी कोंढवा पोलिस ठाणे कडील तपास पथकाला सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि दिनेश पाटील, व तपास पथकातील स्टाफ असे कोबिंग ऑपरेशन दरम्यान रेकार्ड वरील आरोपी चेक करुन त्याची झडती घेवून तसेच गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने अग्नीशस्त्राबाबत माहिती काढत होते. आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार विशाल मेमाणे यांना त्याच्या विश्वसनिय खब-याकडून बातमी मिळाली की, बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ एक केस वाढविलेला व त्याच्या सोबत एक जण काही दिवसापासुन येत असुन ते गुन्हेगार आहेत ते त्यांच्या कमरेला पिस्टल लावुन फिरत असतात. त्याप्रमाणे १४/१२/२०२३रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ येणार आहे, अशी माहिती मिळाली.

सदर माहितीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी आदेशित केले. त्याप्रमाणे सहा पोलिस निरीक्षक दिनेश पाटील व तपास पथकातील स्टाफ असे पंचाच्यासह दोन टिम करुन गारवा हॉटेलच्या येथे वेषातंर करुन थांबलो. मिळालेल्या बातमीप्रमाणे लाल रंगाचा शर्ट घातलेला केस वाढविलेला व त्याच्या सोबत असणा-या ग्रे रंगाचा टि शर्ट घातलेला असे दोन जण १९.४५ वा सुमारास वडाफच्या गाडीतुन उतरुन गारवा हॉटेलच्या दिशेन जावू लागले. बातमीदाराने सदर इसम हे तेच असल्याचे इशारा करुन सुचित केले असता त्यांना स्टाफच्या मदतीने बेसावध ठेवुन पकडण्याकरिता गेलो असता त्यांना आमचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेवुन डोगंराच्या दिशेने पळुन जावु लागले. तेव्हा त्यांना थोडयाच अंतरावर पाठलाग करुन पकडुन ताब्यात घेतले.

१) संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय ३२ वर्षे, रा. गोकुळ हौसींग सोसायटी, आंगणवाडी चौक शेजारी मोरे वस्ती चिखली), २) शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय ३४ वर्षे रा.मु.पो वाशेरे, ता.खेड जि. पुणे) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांची झडती घेवु लागलो असता ते विरोध करु लागले तेव्हा त्यांच्याकडे काही तरी संशयीत वस्तु असल्याचा संशय आल्याचे त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला प्रत्येकी एक पिस्टल व एकाच्या पॅन्टच्या खिशात ३ व एकाच्या खिशात २ जिंवत काडतुसे मिळुन आली आहे. त्यांच्याकडे अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत तसेच त्याच्याकडे अग्नीशस्त्र जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असुन स्वरक्षणासाठी जवळ विनापरवाना जवळ बाळगले असल्याचे सांगितले.

संदेश उर्फ संजय अंकुश जाधव याच्यावर चिखली, देहुरोड, वडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलिस ठाणे येथे दरोडयाच प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, तसेच बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळल्याबाबत एकुण ३२ गुन्हे व शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर याच्यावर खेड पोलिस ठाणे येथे खुन, जबरी चोरी, व सरकारीकामात अडथळा केल्याबाबत एकुण ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोघां विरुध्द बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे आणखीन अग्नीशस्त्र असल्याबाबत दाट शक्यता असल्याने व त्यांनी सदर अग्नीशस्त्र कोणाकडुन खरेदी केली आहे, याबाबत तपास केला असता, शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर यांच्या घरझडतीत लपवुन ठेवली आणखीन ३ अग्नीशस्त्र व ९ जिवंत काडतुसे मिळुन आली ती जप्त करण्यात आली आहे.

आरोपी यांच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र ही कोठुन आणली याबाबत तपास केला असतांना त्यांनी महाराष्ट्र ते मध्यप्रदेश सिमेवरिल गाव उमरटी, ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश या गावातील ओमंकार बर्नाला हयाच्याकडुन घेतल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने पोलिस उप आयुक्त आर. राजा यांनी टिम तयार करुन नमुद आरोपी यास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर माहिती प्रमाणे मध्यप्रदेश येथे जावुन ओमंकार बर्नाला याला पकडणे असल्याने त्यास अटक आरोपी यांच्या मार्फतीने संपर्क करुन आणखीन दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसाची मागणी केली. तेव्हा त्याने सदर अग्नीशस्त्र हे सुर्या हॉटेल जवळ चोपडा अडावत रोड ता. चोपडा जि. जळगाव येथे घेवुन येतो असे सांगितले. तेव्हा त्यास पकडने करता कोंढवा तपास पथकातील स्टाफला स्थानिक रहिवाश्याप्रमाणे पेहेराव करुन जागोजागी थांबवून सापळा रचला. ओमंकार बर्नाला हा स्वतः त्याचा हस्तक राहुल नानसिंग लिंगवाले याच्यासह नमुद ठिकाणी येवुन आमच्या पासुन थोडया अंतरावर थांबून हस्तकाकडे दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसे पाठवुन दिले. आम्ही हस्तकास ताब्यात घेवुन ओमंकार बर्नाला यास पकडण्या करिता गेलो असता तो
त्याच्याकडील मोटार सायकलवरुन पळुन गेला. हस्तक राहुल नानसिंग लिंगवाले याच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र व काडतुसे जप्त करण्यात आली आहे. सदर हस्तक यास नमुद दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी यांच्याकडून एकूण ३,५०,००० /- रुकिंमतीची ७ अग्नीशस्त्र व १२,००० /- रु किंमतीची २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. नमुद गुन्हयातील अटक आरोपी यांच्याकडे सहा पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील हे अधिक तपास करित आहेत.

संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ आर. राजा, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग शाहूराजे साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, कोंढवा पोलिस स्टेशन, पोलिस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हवालदार/६९५१ विशाल मेमाणे, पोलिस हवालदार / ११६१ सतिश चव्हाण, पोलिस हवालदार/७९ निलेश देसाई, पोलिस हवालदार /१४२२ लवेश शिंदे, पोलिस अंमलदार / ४७९ शाहीद शेख, पोलिस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर, पोलिस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलिस अंमलदार/२१८५ सुजित मदन, पोलिस अंमलदार /१०११६ ज्ञानेश्वर भोसले, पोलिस अंमलदार / ४९० सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…

कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…

कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…

कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!