इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…
पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे.
रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतरही रवि कुमार लग्न करण्यावर ठाम राहिला. दोघांनी लग्न केल्यानंतर तो आधिका हिला घेऊन घरी गेल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
कुटुंबियांनी दोघांनाही मारहाण करून घराबाहेर काढले. यानंतर रवि कुमार याने कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, पत्नीला किन्नर म्हणून अपमानित केले आणि ६० लाख रुपयांचा हुंडा मागितला म्हणून तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, रवि कुमार एका खासगी कंपनीत काम करत आहे तर आधिका बिहार पोलिसमध्ये भरती होण्यासाठी तयारी करत आहे. दोघांनी जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षेची मागणी केली आहे.
परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…