कोंढवा पोलिसांनी आरोपीकडून चोरीची चारचाकी, दुचाकी, मोबाईल केले जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत पकडलेल्या आरोपींकडून चोरीची 1 चारचाकी 1 दुचाकी मोटरसायकल व 2 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर शहर गुरन.1102/2023 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरिष्ठांनी दाखल गुन्हायातील आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता. सदर गुन्ह्यातील आरोपी युसुफ वजीर शेख हा आश्रफ नगर येथे त्याच्या राहते घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार विकास मरगळे व सुहास मोरे यांना प्राप्त झाली होती. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक लेखाची शिंदे तपास पथकातील अंमलदार अमोल हिरवे राहुल वंजारी, जयदेव भोसले, राहुल थोरात, राहुल राजगे, अभिजीत रत्नपारखी, आशिष गरुड, सुहास मोरे, रोहित पाटील, शशांक खाडे ,विकास मरगळे असे आलिफ टॉवरच्या बाजूला मोकळ्या मैदानात सोबतच्या पोलिस स्टाफच्यासह सापळा रचून थांबलो होते.

आरोपी हा सहाच्या सुमारास घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असल्याबाबत बातमीदारांनी कळविल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता युसुफ वजीर शेख (वय 23 वर्षे राहणार अश्रफ नगर गौसरवरा मस्जिद समोर गल्ली नंबर ७ न्यू ग्रीन बिल्डींग मध्ये कोंढवा खुर्द पुणे) असे सांगितले. सदर आरोपी या स्थापत घेऊन दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत आरोपीने गुन्हा केल्याचे सांगितले.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक सहा.पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, विक्रम देशमुख पोलिस उपयुक्त परि ०५, शाहू राजे साळवे सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदीप भोसले पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!