नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…
भोपाळ (मध्य प्रदेश) : विवाह सोहळा पार पडल्यानतर नवरी एकच रात्र नवरदेवासोबत राहायची. मध्य रात्रीच्या सुमारास हळूच घरातील सोने, पैसे घेऊन पळून जात होती. युवतीने अशा पद्धतीने सहा लग्न केली होती. पण, सातवे लग्न सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी एका नवरीला लग्नातच अटक केली असून, तिचा हा सातवा विवाह होता. युवतीने सहा जणांसोबत लग्न केले होते आणि नंतर त्यांना लुटून पळून गेली होती. मंडपात बसलेल्या नवरदेवाला हा प्रकार कळताच त्याला धक्का बसला. हरदामधून ही घटना समोर आली आहे. हरदाचे पोलिस अधीक्षक अभिनव चौकसे यांनी सांगितले की, अनिता नावाच्या युवतीने 24 जून रोजी हरदा येथील युवक अजय पांडेसोबत लग्न केले होते. 30 जून रोजी वधू पतीसह पार्कमध्ये फिरायला गेली होती. पती अजय काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेला होता. यावेळी वधू अनिता बेपत्ता झाली. अजयने तिचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. त्याने फोन केला असता अनिताचा फोन बंद आला. अनिताच्या कुटुंबीयांना फोन केला असता तिथूनही कोणी प्रतिसाद दिला नाही.
पीडित युवकाने वधू बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अजयची वधू आणि तिच्या गँगने फसवणूक केली असावी, असा संशय व्यक्त केला गेला. विवाहापूर्वी अनिताच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये दिले होते. याशिवाय 90 हजार रुपये किमतीचे दागिनेही अनिताला दिले. लग्नानंतर अनिता 30 जून रोजी बेपत्ता झाली. पोलिसांनी अजयच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अनिता आणि तिच्या कुटुंबीयांचे नंबर घेतले. कॉल डिटेल्सच्या मदतीने त्यांना अनिताचे लोकेशन कळले. या प्रकरणी नववधू अनिता उर्फ शिवानी दुबे, आई रेखा, अपंग वडील गजानन उर्फ कल्लू, आत्या चांदनी आणि मानलेला माना रामभरोस यांना अटक करण्यात आली आहे. अनिताला अटक झाली तेव्हा ती नवरीच्या वेशभूषेत होती आणि सातवे करण्याच्या तयारीत होती. मात्र सात फेरे घेण्याआधीच पोलिसांनी तिला आणि तिच्या टोळीला पकडले. फसवणूक केलेले पैसे आणि दागिनेही पोलिसांनी त्यांच्या कडून जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…
हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…
वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…
एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…