नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…

कोल्हापूर : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेला युवक पत्नीला माहेरी सोडून आला आणि राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कागलमध्ये घडली आहे. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. रोहितची आई त्यांच्या माहेरी गणेशोत्सवासाठी गेली होती. रोहित पत्नीला माहेरी सोडून आला होता. त्यामुळे घरी रोहित आणि त्याची आजी असे दोघेच होते. रोहितने राहत्या घरात दुसऱ्या माळ्यावर खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, रोहितच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…

हृदयद्रावक! पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने घेतला जगाचा निरोप…

ध्रुवचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा केला वापर; सीसीटीव्हीत तपासले तर…

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!