भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; १६ मोटारसायकल हस्तगत…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून त्याचे ताब्यातून चोरीच्या एकूण ३,८४,०००/- किंमतीच्या तब्बल १६ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठ्या प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे यांनी वारंवार होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत विश्वनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.

विश्वनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांनी भोसरी पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी सापळे लावुन व मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. ०६/०३/२०२४ रोजी विश्वनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांच्या तोंडी आदेशाने पोलिस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे यांनी दोन वेगवेगळया टीम तयार करुन पोना १८५० पोटे, पोना १८१० भोजणे, पोशि २३८० नरवडे, पोशि २२१९ खाडे, पोशि २६३४ गोपी, पोशि २४४४ जाधव, पोशि २७०७ सातपुते असे भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोना १८५० पोटे, पोना १८१० भोजणे, पोशि २३८० नरवडे यास त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फत महिती मिळाली होती.

रेकॉर्डवरील आरोपी योगेश शिवाजी दाभाडे (वय २४ वर्ष, रा. बळसाने, ता. साकी जि. धुळे) हा पिवळा टि-शर्ट घालुन गाव जत्रा मोकळे मैदान येथे एका दुचाकीसह थांबला असल्याने त्यास सापळा लावुन ताब्यात घेतले. सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या १६ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, नाशिक सिटी पोलिस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण पोलिस, जळगाव ग्रामीण पोलिस, धुळे ग्रामीण पोलिस येथे यापुर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण १७ गुन्हे केले आहेत. नमुद आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण ३,८४,०००/- रुपये किं.च्या १६ मोटार सायकल हस्तगत करणेत आले असुन त्यापैकी खालील पोलिस ठाणेचे एकुण १४ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, विश्वनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसरी पोलिस स्टेशन, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोउनि बालाजी जोनापल्ले, पोउपनि मुकेश मोहारे, पोलिस नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, मपोना मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दुचाकीवरून येऊन मंगळसुत्र चोरणाऱ्यांना भोसरी पोलिसांनी केली अटक…

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी हस्तगत…

पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…

भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!