वारजे माळवाडी पोलिसांनी उच्चशिक्षित गुन्हेगाराकडून लॅपटॉप केले जप्त…
पुणे (संदीप कद्रे): वारजे माळवाडी पोलिसांनी उच्चशिक्षित गुन्हेगाराकडून एकूण १२ लॅपटॉप, ०७ लॅपटॉप चार्जर, ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा, ०२ दुचाकी जप्त करुन पुणे शहर तसेच महाड शहर पोलिस स्टेशन, रायगड व मानगाव पोलिस स्टेशन जिल्हा रायगड येथील एकूण ०८ गुन्हे उघडकीस आणून ६,९०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये कॉलेज परिसरतील बिल्डींग / हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांनी बुट अथवा दरवाजाजवळ ठेवलेली चावी वापरून विद्यार्थ्यांचे रुममध्ये चार्जिगला लावलेले किंवा रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याने वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर ४५२ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. अशा प्रकारे वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांनी तपास पथकातील अधिकारी नरेंद्र मुंढे यांना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत योग्य त्या सुचना देवून कर्वेनगर कॉलेज परिसरात तपास पथकातील अंमलदार यांना पेट्रालिंग करणेबाबत व सापळा लावून कारवाई करनेबाबत सुचना दिल्या होत्या.
तपास पथकाचे अधिकारी नरेंद्र मुंढे व तपासपकतील स्टाफ पोहवा / ६९३५ शेलार, पोना / ७७७३ मासाळ, पोशि/ ९०१३ भुरुक, पोशि/ ९१५६ मोरे, पोशि/ ९९७८ खिलारी आणि पोशि/ १०१०७ कामठे असे दिनांक ३१/१०/२०२३ रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाणे गुरनं ४५२/२०२३ भादंवि कलम ३८० मधील घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील प्राप्त फुटेज मधील लॅपटॉप चोरी करण्याच्या संशयितांचा शोध घेत असताना पोउपनिरी मुंढे यांनी टेक्निकल डेटा अॅनालिसिस करुन व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन सापळा रचला. नमूद स्टाफसह फुटेज मधील अर्जुन तुकाराम झाडे (वय २२) यास त्याचे राहते रुम मधून ताब्यात घेवून त्याचेकडे रुममध्ये मिळुन आलेल्या लॅपटॉप बाबत विचारपूस केली असता तो उडवा-उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागला. मिळून आलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता नमूद गुन्ह्यातील चोरीस गेले लॅपटॉप त्याचेकडे मिळून आल्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे निष्पन्न झाले.
अर्जुन तुकाराम झाडे याला अधिक तपासकामी अटक करुन त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील वारजे, कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड या परीसरातून लॅपटॉप चोरी केले असल्याची तसेच तो यापुर्वी महाड रायगड येथे शिक्षणासाठी असताना त्याने महाड व मानगाव येथे दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. आरोपीची मा. न्यायालयाकडून पोलिस कोठडीची रिमांड घेवून आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीचे एकुन १२ लॅपटॉप, ०७ लॅपटॉप चार्जर, ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा, ०१ हेडफोन, ०२ दुचाकी असा एकुन ६,४४,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोउपिनिरी नरेंद्र मुंढे हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णिक पोलिस सह आयुक्त, प्रविण पाटील पश्चिम प्रादेशिक विभाग, सुहेल शर्मा परिमंडळ ०३, भिमराव टेळे सहाय्यक पोलिस आयुक्त कोथरुड विभाग, सुनिल जैतापुरकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक वारजे माळवाडी पोलिस स्टेशन व अजय कुलकर्णी पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलिस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांनी केली आहे.
लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…
माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?
पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…
पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!