माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?
पुणे : ‘माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?’ असे दरवेळी नाव बदलून ही युवती अनेकांना मेसेज पाठवते. त्यापैकी काहींना तिने हॉटेलमध्ये बोलावून लुटले आहे. आपल्या सौंदर्याचा वापर करून या तरुणांना लुटत होती. एका युवकाला लुटायला गेलेली ही युवती पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तपासादरम्यान एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिने अनेक युवकांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे शहरातील युवकाचे 21 सप्टेंबर रोजी एका डेटिंग अॅपद्वारे युवतीसोबत बोलणं सुरू केले. गप्पा वाढल्यानंतर दोघेही टेलिग्रामवर संपर्कात आले. मुलीने तिचा नको तो फोटो पाठवला. युवतीने पुढे युवकाला हॉटेल बुक करण्यास सांगितले. दोघेही खोलीत एकत्र होते. युवतीने त्याला पैसे ट्रान्सफर केले, नंतर खोलीमध्येच दोघांमधील जवळीक वाढली. युवतीने पुन्हा पैशांची मागणी केली. पण, युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर युवतीने तिच्या एका मित्राला बोलावले. युवकाला खोलीतच मारहाण करण्यात आली. त्याचे सर्व पैसे, सोन्याच्या अंगठ्या आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या आणि त्यानंतर ती साथीदारासह पळून गेली.
दुसऱ्या घटनेत युवतीने एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री केली. युवकाला हॉटेलच्या रूममध्ये शारिरीक संबंधासाठी बोलावून घेतले. नंतर मित्राला बोलावून हॉटेलच्या रूममध्येच लुटले. ती याच स्टाइलने युवकांना लुटत आहे. प्रथम सौंदर्याची भुरळ घालून युवकांना फसवायचं आणि नंतर अशा पद्धतीने लुटायचे. हिचा हा प्रकार सुरू होता. तिने मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अनेकांना फसवल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिस या युवतीता शोध घेत होते. संबंधित युवती मुंबईला गेली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने छापेमारी केली आणि तिला अटक केली आहे. युवती शिवाय तिचा साथीदार नितेश नवीन सिंह (रा. बिहार) यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांनी मिळून अशा प्रकारे अनेकांना लुटले होते. या दोघांनी फसवणूक केलेल्या इतरांचा पोलिस शोध घेत आहेत. लुटलेले सोन्याचे दागिने आणि रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…
पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…
युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…
पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…
गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!