पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

पुणे: एक महिला मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र, चिमुकली खिडकीत बाहेर लोंबकळू लागल्यानंतर एका अग्निशमन दलातील जवानाने धाव घेत जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी मधील सोनवणे बिल्डींगमध्ये ही घटना घडली आहे. चांदणे नावाची महिला तीच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र त्यानंतर चार वर्षांची ती मुलगी चालत खिडकीच्या बाहेर लोंबकळू लागली. हे सगळं दृष्य पाहून सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरड केला. अग्नीशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण यांचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते घरीच होते. त्यांनी तत्काळ तिसऱ्या माळ्यावरती धाव घेतली. मात्र घराला कुलुप होते. त्यामुळे चव्हाण पुन्हा धावत खाली आले आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरुन ओढून खिडकीतून आतमध्ये घेतले. सकाळी नऊ वाजुन सहा मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टी असलेला जवान योगेश चव्हाण यांनी आज सकाळी प्रसंगावधान दाखवत त्या चिमुकल्या मुलीचा जीव वाचवल्याने त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे. काञज, गुजरवाडी, खोपडे नगर येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून पडण्याच्या स्थितीत दिसताच तातडीने या जवानाने धाव घेत चार वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला आहे.

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

Video: खाकी वर्दीतील रणरागिनीने न डगमगता पकडला 18 फुटांचा किंग कोब्रा…

पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…

पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…

पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!