
भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…
जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत.
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. मंदिरात महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा करायचे नियोजन असल्याने शुक्रवारी ७ नागरिक ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जात होते. आज सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्व निघाले होते. बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रकने क्रुझरला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तुषार जाधव (वय २५, रा. खोटे नगर, मूळ गाव धोबी वराड), विजय हिंमतराव चौधरी (वय ४२ रा.साई नगर), भूषण सुभाष खंबायत (वय ४५ रा.साईनगर) यांचा अपघातात मृत्यू झाला असून ४ भाविक जखमी आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी क्रेन मागवून क्रूझर बाजूला करण्यात आली. अपघातग्रस्त वाहने पाळधी पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…
नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

