
लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
पुणे: लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडला आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे.
सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर प्रदेश) आणि अंकिता अजय कुमार सिंग (वय 26, रा. सावरदरी, जोंधळजाई मंदिराच्या शेजारी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजयकुमार सिंग (वय 28) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. अजयकुमार हे एका कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नाच्या आधीपासून सचिनकुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. हे पती अजयकुमारला माहिती होते. त्याने अंकिताला सचिनकुमार याच्याबरोबर बोलत जाऊ नको, असे सांगितले होते.
अजयकुमार घरात रात्री जेवण करून झोपले होते. त्याचवेळी रात्री उशिरा, रुममध्ये कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. रात्री साडेबारा वाजता अजयकुमार झोपलेल्या रुममध्ये अंकिता आणि सचिनकुमार आल्याचे त्याने पाहिले. अजयकुमारने त्यांना जाब विचारला असता अंकिता आणि सचिनकुमार या दोघांनीही अजयकुमार यांना मारहाणीस सुरवात केली. भाजी कापण्याची धारदार सुरीने गळ्यावर, पोटावर, छातीवर वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अजयकुमारने त्यांच्या ताब्यातून सुटका करत घराबाहेर धाव घेतली. त्याचा आवाज ऐकुन लोक बाहेर आले. नागरिकांनी खोलीला बाहेरुन कडी लावत अंकिता व सचिनकुमार यांना आतमध्ये कोंडून ठेवले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. अजयकुमारला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

