मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…

मुंबई : मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत. एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

अब्दुलकर अब्दुल मजीद (मूळ रा. चेन्नई) या इलेक्ट्रिशियनकडे गुरुवारी (ता. ७) रात्री एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची सोन्याची पावडर असलेले बॉल सापडले आहेत. त्याने डोंगरीतील शकील नावाच्या व्यक्तीकडून हे चेंडू घेतले होते. तिथून हे अंधेरीत एका व्यक्तीकडे द्यायचे होते. पण संबंधित व्यक्तीकडे पोहोचवण्याआधीच इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अटक केली आहे.

अब्दुल हा वडाळा परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे १४५७.२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बॉल सापडले. त्याला या सोन्याच्या बिलाची पावती दाखवण्यास सांगितले पण त्याच्याकडे याची कोणतीच माहिती नव्हती. जप्त केलेले चेंडू हे प्लास्टिक टेपने गुंडाळून ठेवले होते. पोलिसांनी सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त केले असून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुलची चौकशी केली असता त्याने सांगितले की, ‘शकील नावाच्या व्यक्तीचे हे बॉल आहेत. अब्दुल चेन्नईचा असून डोंगरीतील दर्गा भागात राहत होता. याच भागातल्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर अब्दुलच्या चुलत भावाने सोन्याच्या पावडरचे बॉल शकीलकडून घेतले आणि ते अंधेरीत द्यायचे होते. ते देण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी अब्दुलला पकडले आणि सगळा प्रकार उघडकीस आला. हे सोनं कुठे, कशासाठी नेलं जात होतं याचा अधिक तपास केला जात आहे.’

पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…

पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…

संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!