प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…
पुणे: प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पीडित तरुण ही दहावीत शिकायला असून, छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्रासोबत पळून आली होती. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आले होते. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. पोलिस गणवेशात अनिल पवार हा तेथे होता. पोलिस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसून ठेवले.
आरोपी अनिल पवार याने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि ठाकूर यास बंद केले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूर याला या दोघांनी सोडून दिले. पण, पवार आणि तिवारी तिच्यावर बलात्कार करत होते.
दरम्यान, पीडित युवतीचे वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना घडलेली घटना सांगितली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…
धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!