दिशा सालियान हिच्या लॅपटॉपमध्ये मिळाला महत्त्वाचा डेटा…

मुंबईः दिशा सालियान हिच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियान यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता. आपले व्हाट्सएप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती. महिलेला पैसे दिल्याच जाब 2 जून 2020 ला वडिलांना विचारला होता, 4 जूनला दिशाने घर सोडले होते. वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याचे दिशाने मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही दुजोरा दिला आहे.

दिशा सालियन हिने आत्महत्या केली की तिची हत्या केली, याच्या तपासादरम्यान पहिल्या एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. दिशाला तिचे वडील सतीश सालियन एका महिलेशी बोलत असल्याचा संशय होता, त्यानंतर दिशाने तिच्या लॅपटॉपमधील तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस त्याच्या नकळत घेतला होता, जेणेकरून तिचे वडील कोणाशी बोलतात आणि काय करतात हे तिला कळू शकेल.

यावेळी दिशाच्या लक्षात आले की, तिच्या वडिलांनी एका महिलेला 3000 रुपये पाठवले आणि तेही तिला न सांगता. 2 जून 2020 रोजी दिशाने त्या चॅटच्या आधारे तिच्या वडिलांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर 4 जून 2020 रोजी दिशा घर सोडून मालाड मालवणी येथे गेली. याबाबत दिशाने तिच्या मैत्रिणींशी चर्चाही केली होती.

आधीच्या एसआयटीच्या तपासामध्ये असं समोर आलं होतं की, दिशाच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं त्यावेळी त्यामध्ये उल्लेख होता की, दिशाने मित्रांना सांगितले होते की, दिशाच्या वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवले होते. मात्र, सतीश सालियान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला तेव्हा त्यावेळी पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले ती महिला त्यांच्या मित्राची पत्नी आहे आणि तिला पैशाची गरज होती, म्हणून पैसे दिले होते. यामागे चुकीचा विचार नव्हता, यामागे कोणत्याही चुकीच्या प्रकारचा हेतू नव्हता. पण दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियान यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे आणि डेटा हा चौकशीचा भाग आहे. मात्र, यामुळे दिशा देखील डिस्टर्ब असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता. मात्र, आत्ता एसआयटीद्वारे पुन्हा एकदा तपास व्हावा, त्याचबरोबर दिशाच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आमदार आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सतीश सालियान यांनी याचिकेतून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा. पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा. दिशाचे शवविच्छेदन करतानाचे चित्रीकरण आणि कागदपत्र समोर आणावे. आदित्य ठाकरेंसह त्यांचा बॉडीगार्ड, सुरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलिसांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे. दिशाचा फोन आणि लॅपटॉप दिशाचा प्रियकर रोहन रॉयकडे देण्यात आले आहेत. ते दिशाच्या कुटुंबाकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.

दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…

दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि पतीची बदली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!