हृदयद्रावक! पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने घेतला जगाचा निरोप…
सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय 34, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. प्रमोद यांचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रमोद यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले असून, ते अनुकंपाखाली भरती झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. श्रीराम कॉलनीमध्ये राहणारे चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी यांच्या बेडरुममध्ये पंख्याला कडी होती. नायलॉन दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. याबाबत घर मालक दयानंद घोडके यांनी फिर्याद दिली.
शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कोळी हे चांदोलीत झोळंबी या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून ते पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री आठनंतर ते बेडरुममध्ये काम करत बसले होते. त्यांची पत्नी प्रणाली बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या. मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रणाली या प्रमोद यांना उठवण्यासाठी गेल्या असता बेडरुमच्या दरवाजाला आतून बराच वेळ आवाज देऊन कडी काढली नाही. त्यामुळे घरमालक घोडके यांना माहिती दिली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा फोडून काढला असता, आतमध्ये प्रमोद यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…
महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…