महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूर येथे रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका युवकाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असे या भाजप नगरसेवीकेचे नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अमनदीप भाटिया असे पीडित युवकाचे नाव आहे. अमनदीप हा पत्नी गुनीत सोबत जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. त्यावेळी शुक्ला यांची गाडी भाटियांच्या गाडीच्या पाठीमागे होती. शुक्लाच्या गाडीने हॉर्न मारून पुढे जाण्यासाठी जागा देण्यास सांगितले. पण, बाजूला ट्रक असल्याने अमनदीप याला गाडी बाजूला घेता आली नाही. काही वेळाने शुक्लाने त्यांची गाडी पुढे नेली आणि आडवी थांबवली. त्यामुळे भाटियांच्या गाडीला थांबावे लागले.

मोटार थांबताच त्यातून काही लोक उतरले आणि अमनदीप यांना मारहाण करू लागले. या मारहाणीत अमनदीप यांच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमनदीप यांचा एक डोळा पूर्णतः निकामी झाला आहे. गुनीत भाटिया यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सौम्या शुक्ला आणि अंकित शुक्ला यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सौम्या शुक्ला हिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!