
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…
नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने जि. निमच राज्य मध्यप्रदेश येथील न्यायालयाने जारी केलेल्या अटक वारंट मधील आरोपी जेरबंद करुन धडाकेबाज कामगिरी केली आहे.
नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी राज्य मध्यप्रदेश व राज्य गुजरात येथील आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांचेकडील फरार, पाहिजे आरोपी पकडणे बाबत न्यायालयाचे आदेशाने वारंट पाठविले होते. सदर अटक वारंट मधील आरोपी पकडणे बाबत गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने जावद पोलिस ठाणे, जिल्हा निमच, राज्य मध्यप्रदेश यांचे कडील केस क्रमांक २६० / २०१० मधील पाहिजे आरोपी मिलींद सुदामा कांबळे (वय ४२, रा. सातपुर, नाशिक) हा सातपुर परिसरात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार डी. के. पवार व प्रविण चव्हाण यांनी काढली होती.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) यांना देवून पथकातील अंमलदार यांनी सातपुर परिसरात सापळा रचला. आरोपी मिलींद सुदामा काबंळे यास शिताफीने ताब्यात घेतले असून सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी जावद पोलिस ठाणे, जिल्हा निमच, मध्यप्रदेश यांचे ताब्यात देण्यासाठी गुंडा विरोधी पथक रवाना झाले आहे. सदरच्या कारवाईने नाशिक पोलिस दल व मध्य प्रदेश पोलिस दल यांनी गुंडा विरोधी पथकाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार डी. के. पवार, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, सुनिल आडके, राजेश सावकार, विजय सुर्यवंशी, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश नागरे, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…
नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…
अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…
नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

