पोलिसकाका Video News: २२ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना वाढदिवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
पुणेः लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना वाढदिवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले सत्यसाई कार्तिक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
पुण्यात पोलिसाकडून पीएमटी चालकाला मारहाण
पुणेः पुण्यात पीएमटी बसचा धक्का लागला म्हणून पोलिस कर्मचाऱ्याकडून पीएमटी बस चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचा झळकला फोटो
पुणेः तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृ्द्धाच्या मुलाने पोलिसात धाव घेतली आहे.
मनोरमा खेडकरने न्यायालयात वाचला तक्रारींचा पाढा
पुणेः मनोरमा खेडकरला कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. कोठडीतील असुविधांविषयी त्यांनी कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीत जेवण बेचव मिळत असल्याची तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
पुणे शहरात महिलेला मुलांसमोर मारहाण
पुणेः महिला आपल्या दोन मुलांसह जात असताना ओव्हरटेक करण्याच्या वादातून तिला मारहाण करण्यात आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत या महिलेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. जेरीलन डिसिल्व्हा असे या महिलेचे नाव आहे. बाणेर पाषाण लिंक रोडवर या महिलेवर अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिममध्ये व्यायाम करताना उद्योजकाचा मृत्यू
छत्रपती संभाजी नगर शहरातील एका जिम मध्ये व्यायाम करत असताना एका उद्योजकाला हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सीम्रन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.
नाशिकमध्ये स्क्रॅप खरेदीतून उद्योजकाची मोठी फसवणूक
नाशिक: स्क्रॅप खरेदी करताना वजन काटे मालकांशी संगनमत करून वजनात फेरफार करीत उद्योजकाची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही वजनकाटे सील करण्यात आले आहे.
सांगली शहरात पोलिसांनी तलवारींचा साठा केला जप्त
सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल 10 तलवारी आणि एक दुचाकी असा 65 हजारांचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केला आहे.
अंधश्रद्धा आणि प्रेमातून गेला नवऱ्याचा बळी
लखनौ (उत्तर प्रदेश) विवाहित महिला अंधश्रद्धा आणि त्यानंतर भोंदूबाबाच्या प्रेमात पडली. दोघांनी कट रचून महिलेच्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. पोलिसांनी पोलिसांनी कन्हैया आणि पत्नी तनू चौधरीला अटक केली आहे.
जळगावमध्ये आदिवासी कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू
जळगाव: एकाच आदिवासी कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली आहे. कुटुंबात साखरपुड्याचा कार्यक्रम असल्यामुळे बालकांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की घातापातामुळे ? असा प्रश्न उभा राहिला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…