तानाजी सावंत यांच्या मुलाची पुणे पोलिसांनी घेतली झाडाझडती; प्रतिप्रश्न करताच…

पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे सोमवारी (ता. १०) पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाले होते. तब्बल पाच तास संपूर्ण यंत्रणा तानाजी सावंत यांच्या मुलासाठी काम करत होत्या. पोलिसांनी सावंतांच्या एका फोनमुळे वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. ऋषिराज सावंत अपहरणनाट्याच्या ४ तासांनंतर म्हणजे रात्री ८ वाजून २० मिनिटांनी पुणे विमानतळावर लँड झाला.

ऋषिराज सावंत याच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आणि यंत्रणा कामाला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याने ऋषीराज सावंत यांची प्राथमिक चौकशी केली जाणार असून, त्यांचा बँकाँकसाठीचा पुणे ते चेन्नई प्रवास जाणून घेतला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले.

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

ऋषिराज दोन मित्रांबरोबर पुण्यात उतरल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. कोणत्या कारणासाठी बँकॉकला गेला होता, उद्देश काय होता? घरात वाद झाला होता का? असे प्रश्न पोलिसांनी ऋषिराजला विचारले. बँकॉकवारीचे कारण विचारल्यावर बिझनेस डिलसाठी बँकाकला चाललो होतो, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. पण मग, जाताना वडिलांना का सांगितले नाही? असे पोलिसांनी विचारताच काही उत्तर दिले नाही. पुणे क्राईम ब्रँचने राञी ऋषिराज सावंत आणि त्याच्या दोन मिञांचा जबाब नोंदवून घेतला. याआधी दुबईलाही बिझनेस डिलसाठीच गेलो होतो, असेही ऋषिराजने पोलिसांना सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर पुणे पोलिसांनी ऋषिराजला घरी सोडले.

दरम्यान, विमानाने युटर्न घेतला मात्र याची ऋषिराजला जराही कुणकूण लागू दिली नाही. चार तासांचा प्रवास करून विमान पुन्हा पुण्यात आले. चार तासांचा प्रवास झाल्याने आपण बँकॉकला आल्याचे ऋषिराजला वाटले. पण जिथून बसलो तिथेच उतरलो, हे जेव्हा ऋतुराजला दिसले तेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला होता.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ पुत्र गिरीराज सावंत यांनी सांगितले की, ‘माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला असल्याचे समजले. घरात कौटुंबिक वाद असल्याची चर्चा गिरीराज सावंत यांनी फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, दहा दिवस अगोदरच ऋषिराज हा दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललाय असे घरचे विचारतील. या कारणाने त्याने घरात कोणालाच न सांगता खासगी विमान बुक केले आणि बँकॉकला निघाला होता.’

पोलिसांनी काल ऋषीराज पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला. पोलीस पुढील तपास करत असून आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. विरोधकांनी कृपया याचे राजकारण करू नये त्यांना देखील मुलं असतील असे आवाहनही गिरीराज सावंत यांनी केले आहे.

तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!