
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रकला पाठीमागून इंडिगो कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाता तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे. शिवाय, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ट्रकला धडक दिल्याने इंडिगो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेश दाभाडे, शुभांगी दाभाडे आणि रिहाश दाभाडे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
इंडिगो कार पुण्याहून अमरावतीच्या दिशेने जात होती. त्यावेळी सिंदखेडराजा तालुक्यातल्या पिंपळखुटा शिवारात हा अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…
थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

