
पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. याबाबत एका युवकाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
१७/०८/२०२० रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निखील माने (वय १९, रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे) याने समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्याठिकाणी तात्कालीन पोलिस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलिसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेच्या चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ अंगावर काळया रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर हातात काचेच्या बांगडया व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले होते. याबाबत तात्कालीन पोलिसांनी अकस्मात मयत दाखल करत तपास सुरु ठेवला होता. परंतु, नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. ०७/१२/२०२३ रोजी याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वपोनि पायगुडे हे करीत होते. त्यानंतर वपोनि पायगुडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदशानाखाली पर्वती पोलिसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हद्यीतील पोलिस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला हि १२/०८/२०२० रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलिस ठाणे अंकित खेड-शिवापूर पोलिस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत पोलिस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यानंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीतास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे (वय २६ वर्षे रा. सुतारदरा, कोथरुड, पुणे मुळ रा. पाटील इस्टेट, गल्ली नंबर ०५, शिवाजीनगर, पुणे) असे असल्याचे सांगितले. त्याने त्याच्या ओळखीची महिला सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६ वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ता. हवेली. जि. पुणे) हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबूल केल्याने पर्वती पोलिस स्टेशन गु.र. नं ३६८/२०२३ भादंवि कलम ३०२ मध्ये अटक करण्यात आली आहे.
नमूद गुन्हयात सर्वप्रथम तिची ओळख पटवणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच आरोपी यांचेबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलिस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलिस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास वपोनि पायगुडे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३. सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पो.नि जयराम पायगुडे, पो.नि. गुन्हे विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केली आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल…
निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर सर्च करून घरफोडी करणारा ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

