
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…
पुणेः कार व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार (ता. 24) बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग दरम्यान घडला आहे.
हर्षदा केतन खानेकर (वय 27 सध्या रा. भायखळा मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटार कार चालक रामेश्वर गणपत सांगवे (वय 23) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी पिकअप चालक सचिन मुरलीधर गोरे (वय 29 रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची कार घेऊन मुंबईकडे जात होते. यावेळी कारमध्ये हर्षदा या पाठीमागे बसला होत्या. त्यांची गाडी चाकण येथील रसिका हॉटेल समोर आली असताना समोरून आलेल्या पिकअपची समोरासमोर जोरात धडक झाली. दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात हर्षदा व फिर्यादी आणि हर्षदा यांच्या सासू हे दोघे गंभीर जखमी झाले. हर्षदा यांना जवळील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…
आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…
शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

