
इंस्टाग्रामवर रिल्स टाकून घेतला जगाचा निरोप; नेत्याच्या भावावर आरोप…
मुंबई : मालाडमधील एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रेश तिवारी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भावाचे नाव घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
चंद्रेश तिवारी यांनी व्हिडिओतून कदम यांचे नाव घेत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये आत्महत्येस रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यासह आणखी दोघांची नावे घेत त्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. सदानंद कदम यांनी मुंबईत इतर कोणत्याही कंपनीत काम करू देणार नाही, असा इशारा चंद्रेश याला दिला होता. याप्रकरणी, चंद्रेशचा भाऊ पावन तिवारी यांनी कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सदानंद कदम यांच्यासह धमकी देणाऱ्या आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…
Video: दिवाळी साजरी करत असताना पाया पडले अन् काका-पुतण्याची केली हत्या…
आरोपीची पत्नी म्हणाली, अत्याचार झाल्याने नशीबवान समजलं पाहिजे…
हृदयद्रावक! तायक्वांदो खेळाडूचे डोकं छाटलं; आईने डोकं हातात घेऊन केला आक्रोश….
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

